केमचे शिक्षक बाळासाहेब देशमुख यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

केमचे शिक्षक बाळासाहेब देशमुख यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

केम (प्रतिनिधी-संजय जाधव ) : केम (ता.करमाळा) येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयातील ऊपक्रमशिल सहशिक्षक बाळासाहेब देशमुख यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सांगोला येथील फॅबटेक काॅलेज मध्ये माजी आमदार दिपक (आबा) साळुंके यांच्या हस्ते देण्यात आला.

बाळासाहेब देशमुख हे राजाभाऊ तळेकर विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यालयात स्काॅऊटचा उपक्रम पहिल्या पासून राबविला. त्यांनी जिल्हास्तरीय स्काॅऊटचे शिबीर देखील केम येथे आयोजित केले होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्काऊट मध्ये यश मिळविले.

त्यांचा कोठल्याही ऊपक्रमात सहभाग असतो त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, कर मल्याचेआमदार संजय शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष महेश तळेकर, मुख्य ध्यापक विनोद तळेकर, मुख्यध्यापक नागनाथ तळेकर, रोपळे विदयालयाचे मुख्य ध्यापक दळवी सर सोलापूर जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालिका शोभा,लोंढे महादेव लोंढे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख व सर्व शिक्षक,शिक्षकेतर, कर्मचारी, नूतन माध्यमिक विद्यालय मुख्य ध्यापक रणदिवे सर वडशिवणे विदयालयाचे मुख्य ध्यापक भिमराव भोसलेश्री ऊत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज चे प्राध्यापक नांगरे सर, श्री छत्रपती संभाजी विद्यालय मुख्य ध्यापक व्यवहारे केम केद्र प्रमुख महेश कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक जाधव एन.डि., माध्यमिक शिक्षक संघाचे मुकुंद साळुंखे, व आलेगाव येथील भैरवनाथ विदयालयाचे मुख्य ध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!