पोथरे येथील तुळशीराम पठाडे यांचे निधन

करमाळा (दि.१९): पोथरे (ता.करमाळा) येथील तुळशीराम यशवंत पठाडे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज रात्री ११ वाजता निधन झाले.
पचनाचा त्रास होत असल्याने त्यांना करमाळा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे मागे पत्नी,दोन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार नानामहाराज पठाडे यांचे ते वडील होते. त्यांच्यावर उद्या (ता.२०) गुरुवारी सकाळी ९ वाजता पठाडे वस्ती (घारगाव वस्ती रोड) पोथरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.