यश-राज या दोघा भावंडांचा १५ ऑगस्टचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा - शाळेला दिली टाकी भेट... - Saptahik Sandesh

यश-राज या दोघा भावंडांचा १५ ऑगस्टचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा – शाळेला दिली टाकी भेट…

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा : लहान मुलांच्या वाढदिवसाला काही पालक अमाप आणि अफाट खर्च केलेले आपण पाहत आहोत, परंतु काही पालक याला अपवाद ठरलेले आहेत, करमाळा शहरात फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे दादा गाडे यांचे यश आणि राज हे जुळे मुले आहेत, त्यांच्या आज (ता.१५) असलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपरिषद मुलांचे शाळा नंबर १ या शाळेस 500 लिटरची टाकी भेट दिली आहे. या उपक्रमानिमित्ताने नगरसेवक प्रविण जाधव तसेच अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. याप्रसंगी नामसाधना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा माने, शिक्षिका अश्विनी ठाकरे, सुनिता शितोळे, सुषमा केवडकर, आशा अभ्यंगराव, मंगल गलांडे, धनश्री उपळेकर, अर्चना ताटे, वैशाली जगताप, भैलुमे मॅडम, कांबळे मॅडम, सुरेश कोळी, लालासाहेब शेरे आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!