यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ध्वजारोहण – 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये 75 वा स्वातंत्र्यदिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत , संस्थेचे विश्वस्त व युवा उद्योजक अशितोष घुमरे , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी , महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने , महाविद्यालयाचे माजी प्रबंधक कैलास देशमुख , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे , कनिष्ठ विभागाचे प्राचार्य , कॅप्टन संभाजी किर्दाक , लेफ्टनंट डॉ.विजया गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखणी कामगिरीबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना गुणांक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच एन.सी.सी. चे CT0 निलेश भुसारे यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्टकार्य केल्याबद्दल तसेच नागपूर येथील कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही येथोचित सन्मान करण्यात आला. तसेच दिल्ली परेडला गेलेल्या कॅडेटचा टाळ्या वाजवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एल. बी . पाटील यांनी स्वातंत्र्यसंग्रामाचा गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांनी अंगीबाळगावे असे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. सुजाता भोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ. मुक्ता काटवटे यांनी मानले. या कार्यक्रमाला एन. सी. सी. , एन. एस. एस . व महाविद्यालयतील विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .