साडे येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू
करमाळा : साडे ( ता.करमाळा) येथे १८ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून पंच क्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साडे येथील सिद्धेश्वर तरुण मंडळाने केले आहे.
साडे गावामध्ये जवळपास २५० वर्षांपासून श्रावण महिण्यामध्ये, श्री सिध्देश्वर महाराज मंदीरामध्ये अखंड हरिनाम होत आलेला आहे. या वर्षी देखिल ह.भ.प. संजयानंद महाराज झानपुरे (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. सिद्धेश्वर तरुण मंडळ व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने सप्ताहाचे आयोजन १८ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान केले गेले आहे.
या सप्ताह काळात सकाळी काकडा भजन सायंकाळी हरिपाठ,प्रवचन, किर्तन आणि भजन इ. कार्यक्रम होणार आहेत. तसेच सकाळी नाष्टा आणि संध्याकाळी पंक्तीभोजन होणार आहे व शेवटी महाप्रसाद होईल. सप्ताह कार्यक्रम काळात मंदिर सुशोभीकरण केले जाणार आहे.
यामध्ये किर्तनसेवा पुढीलप्रमाणे असतील
- १८ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. संजयानंद महाराज झानपुरे (तात्या),
- १९ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. हरिदादा महाराज झानपुरे,
- २० ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. सागरदादा महाराज झानपुरे
- २१ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. मंदारदादा महाराज सरवदे
- २२ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. धनंजय दादा महाराज सरवदे
- २३ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. संजयानंद महाराज झानपुरे (तात्या),
- २४ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. संजयानंद महाराज झानपुरे (तात्या),
- २५ ऑगस्ट कीर्तन सेवा – ह.भ.प. संजयानंद महाराज झानपुरे (तात्या)