केम येथे रक्षा विसर्जित न करता लावली २१ झाडे

केम ( प्रतिनिधी- संजय जाधव) : केम येथील भीमाबाई बापू बिचितकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी १३ ऑगस्ट रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.तिसऱ्या दिवशीचा रक्षा विसर्जन कार्यक्रम बिचीतकर परिवाराने विविध प्रकारची फळांची २१ झाडे लावून एक प्रकारचा समाजाला नवी दिशा देण्याचा उपक्रम राबवला आहे.
केम येथेच नुकतेच परमेश्वर तळेकर यांच्या आईच्या निधनानंतर देखील रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता वृक्षारोपण तेथे रक्षा विसर्जित करण्यात आली. त्यानंतर भारत बापु बिचीतीकर यांच्या परिवाराने देखील या या परिवर्तनाच्या चळवळीला दुजोरा देत २१ फळ झाडांची रोपे आपल्या शेतात लावली. या उपक्रमाचे केम परिसरातून स्वागत केले जात आहे.

रक्षा, अस्थी हे नदीमध्ये टाकल्याने पाण्याचे प्रदूषण होते. हे पाणी मनुष्यप्राण्यासह अन्य पशु पक्षी पीत असतात. पाणी हे पिण्यासाठीच असते मृतवेक्तीचे राख किंवा इतर सामग्री नदीमध्ये टाकून जर तेच पाणी आपण घरी आणले तर आपले घरचे कोणीही लोक हे पाणी पिणार नाहीत .हे खर वास्तव आहे. विनाकारण जे आपल्याला पटत नाही त्या गोष्टी आपण डोळे झाकून करत आलो आहोत कोठेतरी याला बांध घालण्याचा प्रयत्न कोणी तरी केला पाहिजे ,हाच बांध परमेश्वर तळेकर यांनी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत भारत बापू बीचितकर यांनी करून परिवर्तनाची चळवळ सुरू ठेवलीत याबद्द्ल धन्यवाद.
–शहाजी पाटील, ढवळस