जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वीट येथे 1 कोटी 29 लाख रुपये निधी मंजूर – सरपंच सौ वंदना उदय ढेरे..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वीट येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी 1 कोटी 29 लाख 76 हजार 577 रुपये मंजूर झाले असल्याची माहिती वीट गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ वंदना ढेरे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, वीट गावाला उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते .ग्रामस्थांची ही निकड लक्षात घेऊन आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे आम्ही पाणीपुरवठा योजना विषयी मागणी केली . त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन वीट गावासाठी 1 कोटी 29 लाख रुपये असा भरीव निधी मंजूर केल्यामुळे वीट गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी आशा आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून दलित वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी 9 लाख रुपयाचा निधी आमदार संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांचे वीट ग्रामस्थ कायम ऋणी आहेत.