कंदर येथील पैलवान सुरज माने याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…

कंदर प्रतिनिधी/संदीप कांबळे…
कंदर : 2 जानेवारी 2023 रोजी पंढरपूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत कंदर येथील छञपती संभाजी राजे कुस्ती संकुल चा पैलवान सुरज राजेंद्र माने याने 19 वय वर्ष गटात व 65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सुरजच्या या उत्तुंग यशाबद्दल छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल चे संस्थापक पैलवान उमेश काका इंगळे माजी उपसरपंच रावसाहेब जाधव रघुनाथ कामटे वस्ताद सतपाल कंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शंकरराव भांगे , संचालक श्री नवनाथ भांगे ,सचिव प्राध्यापक श्री सुनील भांगे , प्राचार्य श्री बी एस पवार व क्रीडा शिक्षक श्री बनसोडे एस डी , प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , सर्व कंदर ग्रामस्थ व कुस्तीप्रेमी यांनी सुरज चे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सध्या सुरज माने हा कंदर येथील कन्वमुनी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे…
