जनशक्ती संघटनेची 30 जुलै बैठक - पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे अतुल खुपसे यांचे आवाहन - Saptahik Sandesh

जनशक्ती संघटनेची 30 जुलै बैठक – पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे अतुल खुपसे यांचे आवाहन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदच्या 6 गटासाठी व पंचायत समितीच्या 12 गणासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी येत्या 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता करमाळा शहरातील दत्त मंदिर येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस तालुक्यातील जनशक्ती संघटनेच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते, व इच्छुक उमेदवार यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अतुल खुपसे पाटील म्हणाले की, जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवावी अशी भूमिका माझ्याकडे शेकडो कार्यकर्ते व्यक्त करत आहेत, कार्यकर्त्यांची भावना विचारात घेऊन,विचार विनिमय करण्यासाठी 30 जुलै रॊजी हि बैठक आयोजित केली आहे,या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच या बैठकीस गट व गण नुसार इच्छुकांच्या मुलाखती व भावना जाणून घेतल्या जातील.संघटनेची ताकत व एकजूट समाजिक कामासाठी  व जनतेंचे प्रश्न सोडवण्यासाठी गरजेची आहे, त्या करिता या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.  केली.यावेळी त्यांच्या सोबत अतुल राऊत,दत्ता कोकणे,शरद एकाड ,दीपाली डिरे,हनुमंत कानतोडे,वैभव मस्के आदी.कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!