हायवे रस्त्याच्यामध्ये ट्रॅक्टरलावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

हायवे रस्त्याच्यामध्ये ट्रॅक्टरलावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : आदिनाथ साखर कारखान्यासमोर हायवे रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत एका ट्रॅक्टरचालकाने आपला ट्रॅक्टर लावल्याने करमाळा पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना आढळून आल्याने तातडीने त्याला ताब्यात घेवून ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काल (ता.१६) सायंकाळी ६ वाजता घडला आहे. 

याप्रकरणी करमाळा पोलीस कॉन्सटेबल अमोल बापूराव जगताप यांनी फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले कि, आदिनाथ साखर कारखान्याजवळ मी तसेच माझे सहकारी सोबत पोना श्री.ढवळे, पोकॉ.श्री.जगताप पेट्रोलिंग करत असताना आदिनाथ साखर कारखान्यासमोर हायवे रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत एका ट्रॅक्टरचालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र.एम.एच.45 ए.एल.0417 हा वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत लावला होता. त्यामुळे आम्ही तेथे जावून ताब्यात घेवून ट्रॅक्टरचालक राजु बसंत कालमिया (वय 22) रा बरार ता. खंडवा जि. राजगढ़ राज्य.मध्येप्रदेश सध्या रा.पोफळज ता करमाळा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!