केम येथे भैरवनाथ जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

केम येथे भैरवनाथ जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथील सालाबाद प्रमाणे तळेकर गल्लीतील भैरवनाथ मंदिरात काळ भैरवनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त सकाळी आठ वाजता श्री अभिषेक घालण्यात आला. तसेच भैरवनाथ मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता मेणबत्ती कारखानदार बाळासाहेब तळेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ठीक ९ ते१२ या वेळेत झी टॉकीज फेम स्नेहलताई भोसले, जेजुरी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी मि. काळभैरवनाथ चा जन्म झाल्यावर मंदिरात पुष्प वृष्टी, गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर महिलानी भैरवनाथचा पाळणा म्हटला.

या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दि.१७ रोजी सकाळी काल्याचे कीर्तन १० ते १२ या वेळेत ह.भ.प. लालासाहेब चोपडे इंदापूर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. भैरवनाथ भक्त सदाशिव तळेकर यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद चे वाटप करण्यात आले या वेळी मोठया संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!