'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सागर पवार यांची निवड - Saptahik Sandesh

‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सागर पवार यांची निवड

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी सागर पवार यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय (दादा) चौगुले यांच्यावतीने करण्यात आली. चौगुले यांचा दोन दिवस सोलापूर दौरा पार पडला त्यावेळी ही निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सुरेश दादा धोत्रे, संघटनेचे उपाध्यक्ष श्री शंकर अण्णा चौगुले, संघटनेचे सरचिटणीस श्री. तानाजी पोवार साहेब, संघटनेचे उपाध्यक्ष श्री शिवाजी चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रवि शिंदे, नुतन जिल्हा अध्यक्ष श्री.दत्ता गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सुनिल सांळुखे ,सोशल मीडिया प्रमुख तथा श्री. विष्णु चौगुले, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्री बाळू शिंगे, बीड जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल गायकवाड, सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष अनिल जाधव, तालुका सचिव किरण सुकळे,सुरज कुसेकर, उपसरपंच प्रकाश नाना खुपसे
आदीजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!