करमाळ्यात घरासमोरून ६५ हजारांची मोटारसायकल चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी: सुतार गल्ली परिसरात घरासमोर हँडल लॉक करून उभी केलेली सुमारे ६५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.

याबाबत ओंकार सुभाष मारडकर ( रा. सुतार गल्ली, करमाळा) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
४ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांनी सदर मोटारसायकल घरासमोर हँडल लॉक करून लावली होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास बाहेर जाण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसर तसेच करमाळा शहरात शोध घेतला; मात्र मोटारसायकल मिळून आली नाही.

चोरीस गेलेल्या मोटारसायकलची किंमत अंदाजे ६५ हजार रुपये असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
