जेऊर येथील ट्रांन्सफॉर्मर गोडाऊनला अचानक आग – आग विझवण्याचे काम सुरू…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील ट्रांन्सफॉर्मर गोडाऊनला आज (ता.२५) सायंकाळी अचानक आग लागल्याने या आगीत ट्रांसफार्मर व इतर वस्तूचे जवळपास अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आल्या असून सध्या हे आग विझवण्याचे काम सुरू आहे, यात आणखी काय काय वस्तूचा समावेश आहे व किती रुपयांचे नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आग लागल्यानंतर त्याठिकाणी अनेकांनी गर्दी केली होती.