मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिटेवाडी सिंचन योजना मंजूर करण्याचे दिले आश्वासन – रश्मी बागल-कोलते
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी कार्यक्रमात रिटेवाडी सिंचन योजने संदर्भात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी रिटेवाडी सिंचन योजना काम मार्गी लावण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्याचे आश्वासन दिले असल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे.
याबाबत रश्मी बागल आपल्या भाषणातून म्हणाल्या की, रिटेवाडी सिंचन योजना हा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी प्रकल्प योजना आहे, या योजनेमुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिटेवाडी सिंचन योजनेसाठी तातडीने बैठक घेवून सबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
रिटेवाडी सिंचन योजना हा तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय असून, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढे आज ‘आदिनाथ’ कार्यक्रमाच्या निमित्ताने रिटेवाडी सिंचन योजना मंजूर करण्यासाठी मागणी केली, या योजनेस आपण त्वरीत मंजूर करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे या योजनेत येणारी गावे ओलिताखाली येतील. – रश्मी बागल (संचालिका महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ)