"आमदार आपल्या दारी" हा उपक्रम जेऊरमध्ये संपन्न - तालुक्यातून आतापर्यंत 14 हजार नागरिकांना या उपक्रमाचा लाभ.. - Saptahik Sandesh

“आमदार आपल्या दारी” हा उपक्रम जेऊरमध्ये संपन्न – तालुक्यातून आतापर्यंत 14 हजार नागरिकांना या उपक्रमाचा लाभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आज (ता.१८) जेऊर या ठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दहिगाव, शेलगाव, लव्हे, निंभोरे, शेटफळ ,जेऊरवाडी, जेऊर या गावांनी लाभ घेतला.

करमाळा तालुक्यातून आत्तापर्यंत रावगाव, जातेगाव, चिखलठाण, कंदर, केतुर, कोर्टी ,साडे, वांगी नं.3 या ठिकाणी राबवलेल्या उपक्रमांमधून जवळपास 14 हजार नागरिकांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

जेऊर येथील शिबिरांमध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रमाणपत्रांचे वाटपही शिबीर स्थळी करण्यात आले .

आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ कृषी अधिकारी बनसोडे साहेब, अव्वल कारकून बाबासाहेब गायकवाड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी डॉ. रत्नदीप टोपे,पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता वाघमारे , मंडळ अधिकारी काझी, सर्कल वळेकर, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे,माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील, अभय शेठ लुंकड, माजी सरपंच अनिल पाटील सर,करमाळा तालुका राष्ट्रवादी पदवीधर चे अध्यक्ष रवींद्र वळेकर, पै. आप्पा मंजुळे, महादेव आरने ,विक्रांत गांधी, हेमंत शिंदे, निकील मोरे, बाळासाहेब करचे ,राकेश पाटील, अतुल निर्मळ, सागर लोंढे ,पांडुरंग घाडगे, आजिनाथ माने, अजित उपाध्ये ,सुहास शिंदे,अभिजीत मह्मणे, पप्पू कांडेकर हे उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश पाथरूडकर, बालाजी गावडे ,नितीन खटके, दिनेश घाडगे, सुहास तावरे, राजेश ननवरे, बाळासाहेब गरड ,मनोज माने ,महेश कांडेकर, गणेश निमगिरे , धनेश निमगिरे,राजू घाडगे , रणजीत कांबळे ,रमेश लगस, अरुण निर्मळ, समीर केसकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार नितीन खटके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!