पुनवर, वडगाव परिसरात ढगफुटीसदृष पाऊस - मांगी तलाव सांडव्यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू - Saptahik Sandesh

पुनवर, वडगाव परिसरात ढगफुटीसदृष पाऊस – मांगी तलाव सांडव्यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यात सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. आज (ता.१८ पुनवर परिसरात ढगफुटीसदृष पाऊस पडल्याने मांगी तलावात पाण्याची प्रचंड आवक वाढली आहे. परिणामी पुनवर, उत्तर वडगाव, मांगी परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. मांगी तलावाच्या सांडव्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे मांगी तलाव सांडवा क्षेत्रात पुर आला असून उभी पिके वाहून गेली आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील नागरिकांनी या भागातील पंचानामे करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!