बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विविध गावांतील दारू विक्रेत्यांवर करमाळा पोलिसांची कारवाई
करमाळा (दि.१) – बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विविध गावांतील दारू विक्रेत्यांवर करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. ती पुढीलप्रमाणे –
पुनवर येथील कारवाई
२८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास तुकाराम शिवराम गोरे वय ७० रा. पुनवर ता. करमाळा हे घराच्या पाठीमागे आडोशाला बेकायदा एका प्लास्टीकच्या कॅन्ड मध्ये एकुण ९ लिटर घाण व उग्र वासाची हातभटटी दारू १००/- रु. लिटर प्रमाणे एकुण ९००/-रू. किमतीची दारू विक्री करित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले व दारू जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
सरपडोह येथील कारवाई
२८ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास कमल भगवान पवार वय ६० वर्षे, रा. सरपडोह ता.करमाळा ही महिला त्यांचे राहत्या घराच्या बाजुला आडोशाला विनापास, विनापरवाना ९ लिटर हातभटटी दारू १००/- रु. लिटर प्रमाणे एकुण ९००/-रू. किमतीची दारू विक्री करित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले व दारू जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल नितीन आजिनाथ चव्हाण यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
केत्तुर नं २ येथील कारवाई
२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास केत्तुर नं २ ता. करमाळा येथील महेश वसंत पवार वय 35 वर्षे रा. केत्तुर नं 2 ता. करमाळा जि सोलापुर यांनी राहते घराच्या बाजुला पत्राशेडच्या आडोशाला रक्कम रू 900 रू किंमतीची अंबट उग्र घाण वासाची हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उदेशाने जवळ बाळगलेल्या परिस्थीतीत आढळून आले. पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र विलास कावळे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
हिसरे येथील कारवाई
२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास शांताबाई रोहिदास पवार वय 54 वर्षे रा. हिसरे ता.करमाळा जि.सोलापुर यांनी राहते घराच्या बाजुला पत्राशेडच्या आडोशाला विनापरवाना १० लिटर हातभटटी दारू एकुण ९६०/-रू. किमतीची दारू विक्री करित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले व दारू जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल संदिप विश्वनाथ शिंदे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
वीट येथील कारवाई
२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:२० च्या सुमारास मंगेश दगडू ढेरे वय २९ रा. वीट ता. करमाळा हे घराच्या पाठीमागे आडोशाला बेकायदा एका प्लास्टीकच्या कॅन्ड मध्ये एकुण १० लिटर घाण व उग्र वासाची हातभटटी दारू ९०/- रु. लिटर प्रमाणे एकुण ९००/-रू. किमतीची दारू विक्री करित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले व दारू जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गोरख भराटे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
करमाळा येथील कारवाई
२६ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास राजेश शिवाजी दगडे. वय 35 वर्षे, रा बायपास रोड करमाळा,ता करमाळा, जि सोलापुर हे अक्षय हॉटेल, करमाळा -अहमदनगर रोड वर हॉटेलच्या आडोशाला एक पांढ-या रंगाचे प्लॉस्टीकचे कॅन्ड घेवुन एकुण १० लिटर घाण व उग्र वासाची हातभटटी दारू ९०/- रु. लिटर प्रमाणे एकुण ९००/-रू. किमतीची दारू विक्री करित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले व दारू जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल गणेश महादेव शिंदे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे पुढील तपास करत आहेत.