करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. योगेश शिंपी; उपाध्यक्षपदी ॲड. राहुल सावंत

0



करमाळा, दि. 17 (संदेश प्रतिनिधी) – करमाळा वकील संघटनेच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी ॲड. योगेश शिंपी यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. राहुल सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याशिवाय सचिवपदी ॲड. सागर तळेकर आणि सहसचिवपदी ॲड. रागिनी शिंदे यांचीही बिनविरोध निवड झाली.

वकील संघटनेच्या कार्यालयात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष ॲड. रामभाऊ निळ यांनी भूषविले. सूचक म्हणून ॲड. अजित विघ्ने तर अनुमोदक म्हणून ॲड. सविता शिंदे यांनी काम पाहिले.

निवड जाहीर होताच नूतन अध्यक्ष ॲड. योगेश शिंपी व उपाध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांचा उपस्थित सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल तसेच वकिलांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला. नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!