ए टी एस परिक्षेत वांगी येथील अजिंक्य तकीक याचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक.. - Saptahik Sandesh

ए टी एस परिक्षेत वांगी येथील अजिंक्य तकीक याचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राज्यस्तरीय ए टी एस प्रज्ञाशोध परिक्षेत इयत्ता पाचवीमध्ये वांगी नं 2 (ता.करमाळा) येथील अजिंक्य नितीन तकीक याचा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. अजिंक्य हा जिल्हा परिषदेच्या वांगी नं २ येथील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असून, त्याने 26 मार्च 2023 रोजी ही परीक्षा दिली होती, यामध्ये 300 पैकी 266 गुण मिळवून त्याचा जिल्ह्यात दुसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे, त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व वांगी परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!