अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने तहसिलदार व प्रशासन कर्मचाऱ्यांचे मानले आभार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करावे या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने तातडीने घेतल्याने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष ॲड.शशिकांत नरुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार श्री जाधव, सुभाष बदे, करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष ॲड.शशिकांत नरुटे, कोषाध्यक्ष भीमराव कांबळे सचिव, संजय हांडे, सहकोश अध्यक्ष अजीम खान, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर प्रहार संघटनेचे सागर पवार उपस्थित होते.
प्रशासनाने सर्व करमाळा तालुक्यातील पावसाची चिखलाची परवा न करता ऐन दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे केले, त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सदस्यांनी त्याची दखल घेत तहसीलदार यांची भेट घेवून अभिनंदन केले.