जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे भूसंपादन सुरू होणार - आ.संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे भूसंपादन सुरू होणार – आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधीे :
करमाळा : जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचा मार्ग मोकळा झाला असून, प्रत्यक्षात रस्त्याचे कामही सुरू होणार आहे, अशी माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबत बोलताना आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले कि, आपण सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तत्कालीन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे टेंभुर्णी ते जातेगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरित करावा याविषयीची मागणी केली होती. त्यानंतर आपण 2019 मध्ये करमाळा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा रस्ता हस्तांतरित करण्यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा ना हरकत दाखला मिळविला. जवळपास 8 वर्षाच्या कालावधीनंतर आत्ता प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. अशी माहिती आमदार श्री शिंदे यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हटले कि, गेल्या 8 वर्षापासून अहमदनगर- करमाळा – टेंभुर्णी या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्यावरती झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये जवळपास 165 लोकांनी आतापर्यंत प्राण गमावले होते. रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत होते. या कामाला प्रत्यक्षात 2012 साली मंजुरी मिळाली होती. त्यावेळी हे काम सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते , ते काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे बंधन असतानाही ते काम त्यांनी अर्धवट अवस्थेत पडले आहे.

जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता राज्य शासनाच्या अखत्यारीत होता.तो राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याने त्यासाठी राज्य शासनाचा ना हरकत दाखला आवश्यक होता. सदर नाहरकत दाखला मिळण्यासाठी आपण सातत्याने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण , उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तसेच केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार ठेवला त्यानुसार रस्ता हस्तांतरणाबाबत बैठक ही लावली अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
जातेगाव ते नगर हा रस्ता यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालेला होता. तसेच सोलापूर ते पुणे हा रस्ताही राष्ट्रीय महामार्ग कडेच आहे त्यामुळे जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देणे आवश्यक होते. त्यासाठी आपण गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत, असेही आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!