महाड येथील साहित्य संमेलनात डाॅ.अनिल सांगळे यांचा सन्मान - Saptahik Sandesh

महाड येथील साहित्य संमेलनात डाॅ.अनिल सांगळे यांचा सन्मान

पुणे : रविवार (दि.२५ डिसेंबर) रोजी महाड (जि. रायगड) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद रायगड विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ साहित्य संमेलन भरवण्यात आले होते.या कार्यक्रमात मुंबई येथील वंजारी परिषदेचे कार्याध्यक्ष डाॅ.अनिल सांगळे यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने साहित्यिक बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमास वंजारी परिषदेच्या अध्यक्षा सौ.सुरेखाताई शिरसाठ, आणि सरचिटणीस रमेश केदार, प्रकाश शिरसाठ, अभिनेते व चित्रपट निर्माते साहित्यिक उद्घाटक अ.भा.सा.प. राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, डॉ.अ.ना.रसनकुटे ,डॉ.अलका नाईक, सायली पिंपळे,श्रद्धा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साहित्यिक व रसिक मंडळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
हा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा कार्यक्रम अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता व त्यांची टीम यांनी आयोजित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!