सोलापूर येथे 'ग्रंथोत्सव- २०२२' चे आयोजन - वाचनप्रेमींना व पुस्तक विक्रेत्यांना खास संधी - Saptahik Sandesh

सोलापूर येथे ‘ग्रंथोत्सव- २०२२’ चे आयोजन – वाचनप्रेमींना व पुस्तक विक्रेत्यांना खास संधी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक १३ व शनिवार दिनांक १४ जानेवारी, २०२३ या कालावधीत ‘ग्रंथोत्सव- २०२२’ चे आयोजन शिवछत्रपती शिवाजी महाराज, सांस्कृतिक भवन, (रंगभवन) सोलापूर येथे करण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, यासाठी तसेच प्रकाशक ‘व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू आहे.

या अनुषंगाने ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, कवी संमेलन आदी प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे. तसेच साहित्य जगतातील नामवंत साहित्यिकांच्या ग्रंथ संपदेसाठी ग्रंथ दालन उभारले जाणार आहे. वाचन प्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचनासाठी व खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथाचे स्टॉल लागणार असून इच्छुकांनी प्रमोद पाटील ९९२१८००४७५ प्रदीप गाडे ९५९४९८९२५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.

Organization of ‘Granthotsav-2022’ at Solapur – Opportunity for reading lovers and booksellers

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!