सोलापूर जिल्ह्यात हरीतक्रांतीचा मुळ पाया नामदेवराव जगताप यांनी उभारला : आ.संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

सोलापूर जिल्ह्यात हरीतक्रांतीचा मुळ पाया नामदेवराव जगताप यांनी उभारला : आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उजनी धरणाच्या उभारणीत माजी आमदार नामदेवराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्या दूरदर्शीपणामुळेच आज सोलापूर जिल्ह्यात तब्बल ४० साखर कारखाने असून जिल्ह्यात झालेल्या हरितक्रांतीचा मुळ पाया नामदेवराव जगताप यांनी उभारला असून, कै जगताप यांचे शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटले आहे.

कै.नामदेवराव जगताप यांच्या १०३ व्या जयंती निमित्त बाजार समिती येथे आयोजीत समारंभात आमदार संजयमामा बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप होते. यावेळी आ.शिंदे, माजी आ .जगताप यांचे शुभहस्ते नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे युवानेते शंभुराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष नारायण जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य तात्यासाहेब शिंदे, मांगी सोसायटीचे चेअरमन सुजीत बागल, शहाजी शिंगटे, प्रभाकर शिंदे, राजेंद्र चिवटे, परेश दोशी,विक्रांत मंडलेचा, मिलिंद दोशी, मनोज पितळे,अमृत परदेशी , नवनाथ सोरटे,झनकसिंग परदेशी, अँड नवनाथ राखुंडे,जिल्हा बँकेचे वरीष्ठ बँक निरीक्षक अभयसिह आवटे, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांचेसह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक युसुफ शेख यांनी , सुत्र संचालन प्रा . दत्तात्रय भागडे यांनी केले व आभार गटसचिव बबन मेहेर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!