स्व.कल्याणराव गायकवाड यांचे चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त देवळाली येथे ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न.. - Saptahik Sandesh

स्व.कल्याणराव गायकवाड यांचे चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त देवळाली येथे ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पंचायत समितीचे माजी उपसभापती कल्याणराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ ९ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम देवळाली येथील गायकवाड फार्म हाऊसवर संपन्न झाला. स्व. कल्याणराव गायकवाड यांचे चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.

तसेच सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ११७ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन पोलीस उपअधिक्षक डॉ.विशाल हिरे व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना २० लिटरचा पिण्याच्या पाण्याचा जार भेट देण्यात आला. पुण्यतिथीनिमित्त सकाळी दहा ते बारा यावेळेत ह.भ.प. अविनाश भारती महाराज यांचे सुश्राव्य किर्तन झाले. यावेळी देवळाली व परिसरातील हजारोच्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

किर्तनानंतर १२ ते ५ यावेळेत जेवण देण्यात आले. यावेळी देवळाली व परिसरातील रूग्णांसाठी स्व. कल्याणभाऊ गायकवाड यांचे स्मरणार्थ अम्ब्युलन्स लोकर्पण करण्यात आले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांचेसह आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, पंचायत समिती सदस्य ॲड. राहूल सावंत, सरपंच तानाजी झोळ, उद्योजक भरत आवताडे, गणेश करे-पाटील, सुजित बागल, सरपंच गहिणीनाथ गणेशकर, उपसरपंच धनंजय शिंदे, सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, रामभाऊ रायकर, रामा कानगुडे, बापू गुंड, अक्षय गायकवाड, संदीप गायकवाड, माजी सरपंच संतोष गायकवाड, दिपक ढेरे, अतुल वाघमारे, अर्जुन जगताप, सुनील आवटे, राजू घळके, मानसिंग खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनीही रक्तदान शिबीरास भेट देऊन या उपक्रमाचे कौतूक केले आहे.

सवलतीच्या दरात रुग्णवाहिका मिळणार करमाळा तालुक्यात रूग्णवाहिकेची अत्यंत गरज असून ती गरज ओळखून आम्ही स्व. कल्याणभाऊ गायकवाड यांचे स्मरणार्थ रुग्णवाहिकेचा निर्णय घेतला आहे. अनेक रूग्णवाहिका चालक रूग्णांकडून जादा दराने पैसे घेऊन अडवणूक करतात. रुग्णांची ही अडवणूक थांबविण्यासाठी आम्ही ५० टक्के खर्चात व सवलतीच्या दरात ही ॲम्ब्युलन्सची सेवा रुग्णांना देणार आहोत. एखादा रूग्ण अत्यंत गरीब कुटूंबातील असेल व त्याच्याकडे पैसे नसतील तर त्या कुटूंबास मोफत रुग्णवाहिका देण्याची तयारी आम्ही केली आहे. करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. …आशिष गायकवाड (माजी सरपंच, देवळाली) मो.९६८९७८२५२५

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!