जिजाऊ जयंती निमित्त मांजरगावमध्ये विजय महाराज गवळी यांचे हरिकीर्तन.. - Saptahik Sandesh

जिजाऊ जयंती निमित्त मांजरगावमध्ये विजय महाराज गवळी यांचे हरिकीर्तन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) येथे उद्या गुरुवार 12 जानेवारी 2023 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी चार ते सहा या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रबोधनकार ह.भ.प.विजय महाराज गवळी (संभाजीनगर) यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मांजरगाव ग्रामपंचायत व भजनी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रबोधनपर कीर्तनाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्राबरोबरच समाज प्रबोधनाचा जागर केला जाणार आहे.

जिजाऊ-सावित्रीच्या लेकींनी या प्रबोधनपर किर्तन कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह उपस्थित रहावे.त्याचबरोबर शिव,शाहू, फुले,आंबेडकर विचारधारेच्या परिवर्तनवादी युवकांनी आणि समाजबांधवांनी या प्रबोधनपर कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!