वाहतुकीचे सर्व नियम पाळून सुरक्षित वाहन चालवावे – निरीक्षक संभाजी गावडे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : नागरिकांनी आपले वाहन मोटारवाहन कायद्यानुसार वाहनांची नोंदणी व मोटारवाहन कायद्यानुसार सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत तसेच वाहन चालवताना वाहतुकीचे सर्व नियम पळून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन अकलूज परिवहन विभागाचे निरीक्षक संभाजी गावडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अकलूज परिवहन विभागाचे अधिकारी संभाजी गावडे यांचा करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आरटीओ गावडे म्हणाले की, प्रत्येकाने शिस्तीचे पालन केल्यास होणारे अपघात टळतील याबाबत वाहन चालक तसेच पदचारी,वाहनधारकांनी सतर्क असावे आजकाल सर्व लायसेन्स सह सर्व कामे ऑनलाईन झाल्यामुळे कामामध्ये मोठ्या प्रमाणात सुसुत्रता आली आहे.
डिजिटलायझेेशनमुळे वाहने रस्त्यावर चालण्यासाठी परिपूर्ण असतात तरीही वाहन चालकांनी व्यसन करून वाहन चालू नये.वेगावर नियंत्रण असावे, पालकांनी लहान मुलांच्या हातात गाडी चालवयास देता कामा नये असे मत त्यांनी व्यक्त केले वेळोवेळी वाहणांची तपासणी व मुदतीमध्ये रीनेव्हशन करून घ्यावे, असे आवाहन संभाजी गावडे यांनी सत्कार प्रसंगी विचार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य नरेंद्र ठाकुर, नेते सुहास ओहोळ, मकाई सह.सा.का.माजी संचालक अमोल पवार, ओबीसी नेते लक्ष्मण केकाण, विधानसभा अध्यक्ष शंकर सुळ, राहूल आटोळे, रघुनाथ खटके, बाळासाहेब पलंगे मिस्तरी, उद्योजक सतीश रूपनवर, विकास मेरगळ, जिवन होगले, नागेश थोरात, मनोज कुलकर्णी आदी सह रासप पदाधिकारी उपस्थित होते.