करमाळ्यात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे ३० नोव्हेंबरला जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे सोलापूर जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन करमाळा येथे ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत नालबंद मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले असून हे संमेलन बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या संमेलनास उद्घाटक म्हणून आरपीआय-ए पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक आर. आर. पाटील यांनी प्रेसनोटद्वारे दिली आहे.

या प्रबोधन संमेलनामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, त्यावर बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय समीक्षा प्रभारी नासेर शेख, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष नानासाहेब चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील, बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी आयुब पठाण, विज्ञान महाविद्यालय संगोलाचे प्रा. डॉ. मनोजकुमार माने आणि लहूजी क्रांती मोर्चाचे राज्य संघटक भाऊसाहेब कांबळे आदी वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

सदर प्रबोधन संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद आणि दीपक ओहोळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ता. अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, ओबीसी संघटनेचे प्रा. राजन दिक्षित, जमियत उलेमा ए हिंदचे मौलाना मोहसीन शेख, मराठा सेवा संघाचे प्रा. नागेश माने, राजे ग्रुप रंभापुराचे जोतीराम ढाणे, महिला विंगच्या राज्य प्रभारी उषा थोरात, बहूजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, ह.भ.प.सतीश हरिहर महाराज, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, भाई राजू मगर, आनंद काशीद, भटके विमुक्त संघटनेचे सुखदेव चव्हाण, मातंग समाज संघटनेचे युवराज पवार, पारधी समाज संघटनेचे अनिल चव्हाण, जिल्हापरिषदचे अभियंता इंजि. सागर नागणे, सामजिक कार्यकर्ते किशोर थोरे, प्रशांत कांबळे, मल्लिनाथ बनसोडे, अजीज नदाफ, सुधाकर आवटे, डॉ. भारत पवार, बी.के. गायकवाड, कुमार लोंढे, शांतीलाल बागवाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच संमेलनापूर्वी शहरातील बहुजन महापुरुषाच्या पुतळ्यांना वामन मेश्राम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी दुपारी ४ वाजता शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीमध्ये बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या प्रबोधन संमेलनाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!