बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट.. - Saptahik Sandesh

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली . आ.राऊत व माजी आ.जगताप यांचा जुना स्नेह असून २००४ ते २००९ या कालावधीत ते दोघेही विधीमंडळ सदस्य होते.

एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी आ .राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारानेच जगताप गटाचा शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली ना .चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. आ .राऊत यांनी माजी आ. जगताप यांची भेट घेत चर्चा केली, चहापान घेतले व मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रवाना झाले.

याप्रसंगी माजी आ. जगताप यांनी आ . राऊत व अन्य मान्यवरांचा सत्कार केला . यावेळी उद्योजक दिलीप गांधी,जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष कुंडलिकराव गायकवाड, बार्शीचे माजी नगरसेवक प्रशांत कथले, विलास रेणके, विनोद काटे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, संतोष गुगळे, विठ्ठल क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!