आदिनाथ कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थोड्याच वेळात होणार आगमन.. - Saptahik Sandesh

आदिनाथ कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थोड्याच वेळात होणार आगमन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ वा गळीत हंगाम शुभारंभाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थोड्याच वेळात सुरु होत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून सध्या व्यासपीठावर सर्व पदाधिकारी विराजमान झाले आहेत, आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हॅलिकॉपटरने आगमन होणार आहे. 

हा कार्यक्रम आदिनाथ कारखान्याच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते व पाटील गटाचे नेते व माजी आमदार नारायण पाटील यांच्या देखरेखीखाली संपन्न होत आहे. सध्या व्यासपीठावर आमदार राम शिंदे, रणजितसिन्ह मोहितेपाटील, पालकमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील, आजी-माजी संचालक उपस्थित आहेत. तसेच सभासद व शेतकरी उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!