करमाळा तालुक्यात 'भाजपा'च्या बुथ समितीच्या बैठका - लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद - गणेश चिवटे - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यात ‘भाजपा’च्या बुथ समितीच्या बैठका – लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद – गणेश चिवटे


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे करमाळा तालुक्यात प्रत्येक गावोगाव बुथ समितीच्या बैठका घेत असून या बैठकीला लोकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील गावोगाव कमळ चिन्हाला पसंती मिळत आहे. यामुळे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यात आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची विकास कामे केले आहेत व पुढेही ते रिटेवाडी , पोंधवडी चारी व मांगी तलावासारखे पाण्याचे प्रश्न मार्गी लावतील यासाठी त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील गावोगाव प्रचार करून त्यांना करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री चिवटे यांनी आजवर करमाळा तालुक्यातील 70 ते 80 गावात विविध ठिकाणी बैठका घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!