खराब रस्त्याच्या डांबरीकरण मागणीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकावा -भाऊसाहेब सरडे - Saptahik Sandesh

खराब रस्त्याच्या डांबरीकरण मागणीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकावा -भाऊसाहेब सरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जेऊर ते चिखलठाण नं २ (ता.करमाळा) पर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे, सध्या या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून वाहतूक करणे अडचणीचे झाले आहे, यासंबंधी वारंवार मागण्या करूनही याकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, दरवर्षी या रस्त्यावर काही ठिकाणीच माती मुरूम टाकून किरकोळ दुरुस्ती केली जाते, दहापंधरा दिवसांत पुन्हा या रस्त्याने वहाने चालवणे अवघड होते, दहा वर्षात या रस्त्याचे चांगल्या दर्जाचे डांबरीकरण झाले नाही, मतदारांचे सामान्य गरजा पूर्ण होत नसतील तर लोकांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान का करावे असा सवाल करत या परिसरातील मतदारांना या मतदानावर बहिष्कार करावा असे आवाहन भाऊसाहेब सरडे यांनी केले आहे.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडललेले आहेत, या रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास केल्याने लोकांना मणक्यांचे आजार होऊ लागले आहेत, या परिसरातील कुगाव चिखलठाण नं १ व‌ २ केडगाव, शेटफळ या गावाला खराब रस्त्यामुळे शेतमालाचे व्यापारी व पाहुणे मंडळीसुद्धा येण्यासाठी टाळाटाळ करतात, गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरातील कुगाव व चिखलठाण नं २ या गावाला एसटी बस येत नाही.

S.K. collection bhigwan

मतदारांचे सामान्य गरजा पूर्ण होत नसतील तर लोकांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान का करावे असा सवाल करत या परिसरातील मतदारांना या मतदानावर बहिष्कार घालावा असे आवाहन त्यांनी केले आहे यासंबंधी या परिसरातील विविध गावाच्या लोकांशी माझी चर्चा झाली असुन अनेक लोकांनी माझ्या विचारांना सहमती दर्शवली असून यासंदर्भात तातडीने निर्णय न झाल्यास या परिसरातील लोक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!