महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी संदिप शिंदे-पाटील यांची निवड - Saptahik Sandesh

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी संदिप शिंदे-पाटील यांची निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी संदिप शिंदे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांचे उपस्थिती मध्ये सोलापूर शासकीय विश्राम गृह इथे करण्यात आली.

ही निवड संघटनेने संदीप शिंदे-पाटील यांच्या उत्कृष्ट कामाची पध्दत पाहूनच केलेली आहे, याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व करमाळा तालुक्यातील पदाधिकारी दादासो निमगिरे-पाटील,सोमनाथ पाटील,मनोज जामदार-पाटील,अंकुश खरात-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीनंतर संदीप शिंदे-पाटील यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

Yash collection karmala clothes shop advertise
S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!