समाधान बिचितकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक

0

केम(संजय जाधव):   करमाळा तालुक्यातील केम येथील रहिवासी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान भरत बिचितकर हे 22002साली …

केम(संजय जाधव):   करमाळा तालुक्यातील केम येथील रहिवासी तथा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान भरत बिचितकर यांना पोलीस खात्यातील उल्लेखनीय व गौरवपूर्ण सेवेसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

समाधान बिचितकर यांनी सन २००२ मध्ये दौंड येथे पोलीस भरती होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सोलापूर ग्रामीण, सोलापूर एसआरपी तसेच लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली. सध्या त्यांची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे आहे. त्यांच्या पोलीस सेवेला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत.



पोलीस खात्यातील उल्लेखनीय, गौरवपूर्ण सेवा तसेच उत्कृष्ट सेवा अभिलेखाबद्दल यापूर्वी १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचे पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या दुहेरी सन्मानाबद्दल केम येथील ग्रामस्थांकडून समाधान बिचितकर यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!