करमाळ्यात घातक मांजाची सर्रास विक्री सुरू - प्रशासनाकडे कारवाईची मागणी -

करमाळ्यात घातक मांजाची सर्रास विक्री सुरू – प्रशासनाकडे कारवाईची मागणी

0

करमाळा (प्रतिनिधी) : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात पतंग उडविण्याची लगबग सुरू झाली असून, पतंगासाठी…

करमाळा (प्रतिनिधी) : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात पतंग उडविण्याची लगबग सुरू झाली असून, पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक मांजामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बंदी असतानाही शहरातील काही दुकानांमध्ये मांजाची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पतंग कापल्यानंतर हवेत किंवा रस्त्याच्या परिसरात अडकलेला मांजा दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहे. आजपर्यंत अनेक नागरिक मांजामुळे जखमी झालेल्या घटना घडल्या आहेत, अनेकांचा जीव गेला असून देखील हा मांजा अवैधपणे बाजारात उपलब्ध होत आहे. अनेक पक्षी मांजाच्या दोऱ्यामध्ये अडकून मृत्युमुखी पडतात. 

नागरिकांच्या व पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या मांजाची विक्री तातडीने थांबवून संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई करावी. तसेच दुकानांमध्ये तपासणी करून घातक मांजा जप्त करावा, अशी मागणी करमाळा पोलीस निरीक्षक व नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

रमाकांत गटकळ यांना मांजामुळे झालेली इजा

थोडक्यात बचावलो!…

कालच मी पण थोडक्यात वाचलो. मांजाने माझा गळा तसेच मान कापली गेली असती पण हाताने दोरा ओढून धरल्याने हात कापला पण गळा वाचला मांजावर बंदी असताना सुद्धा राजरोस सगळ्या दुकानात विक्री चालू आहे कालच जखम झाल्यावर मी करमाळ्यातील नावाजलेल्या 8 ते 10 दुकानात मांजा आहे का म्हणून मागणी केली तर मिळतोय व पाहिजे का म्हणून विचारले. त्यामुळे नगरपालिका पोलिस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी. – रमाकांत गटकळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!