रावगाव येथे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन व ध्वजारोहण संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार यांजकडून…
करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथे गेले आठ दिवसापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत, वाचनालय ,जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व ग्रामस्थ यांच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,” हर घर झेंडा” यावर जनजागृती अभियान असे उपक्रम राबविण्यात आले तसेच पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यांच्या वतीने रांगोळी ,निबंध , वकृत्व स्पर्धा , वृक्षारोपण मोफत झेंडे वाटप असे कार्यक्रम राबविण्यात आले.
राजीव गांधी वाचनालयाच्या वतीने सैनिकांचा सन्मान “हर घर झेंडा” यावर पथनाट्य, प्रभात फेरी, जनजागृती व मोफत झेंडे वाटप करण्यात आले तसेच 13 ते 15 या कालावधीत घरोघरी झेंडे उभारण्यात आले तसेच शासकीय इमारतीवर ही ध्वजारोहण करण्यात आले,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्यावतीने वासुदेव नाटीका सादर करून “हर घर झेंडा “जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला ,ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच विष्णू गर्जे यांच्या हस्ते ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव येथे सरपंच दादासाहेब जाधव , राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय येथे केंद्रीय मुख्याध्यापक बहिरू गबाले , पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहण झाले नंतर स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले शालेय विद्यार्थ्याना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.