जैतापूर येथील साहित्य संमेलनात डॉ.अनिल सांगळे यांच्या कार्याचा सन्मान - Saptahik Sandesh

जैतापूर येथील साहित्य संमेलनात डॉ.अनिल सांगळे यांच्या कार्याचा सन्मान

पुणे : रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर (ता. राजापूर) येथे दि.७ व ८ जानेवारीला महामानव भागोजीशेठ कीर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात मुंबई येथील
विश्व वंजारी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष
डॉ.अनिल सांगळे यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मान पत्रक देण्यात आले.

डॉ.अनिल सांगळे हे या साहित्य संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून देखील आमंत्रित होते.  यावेळी आयोजकांच्या वतीने विश्व वंजारी साहित्य परिषदेच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात कवी डॉ.सांगळे यांनी कोकण प्रांतात “झोपाळा” हि महाराष्ट्रात गाजलेली कविता सादर केली. या कवितेला रसिकांकडून दाद देण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक शरद गोरे, स्वागताध्यक्ष डॉ.अलकाताई नाईक, जैतापूर न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्रीताई नारे, सामाजिक कार्यकर्ते विजय धोंडू चव्हाण, सुयोगाताई सुनील जठार, सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र बंदीवडेकर आदीजन या कार्यक्रमात उपस्थित होते.

या संमेलनास महाराष्ट्रातील मुंबई,नाशिक पुणे, कोकण तसेच मराठवाडा विदर्भ खानदेश विविध जिल्ह्यातून साहित्य रसिक मोठ्या प्रमाणात हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!