शेतकऱ्यांनी शेतमालाचे मार्केटिंग व ब्रॅंडीग करण्याची गरज – संजय वाकडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतकऱ्यांनी शेती करत असताना आपल्या शेतमालाचे मार्केटिंग स्वतः करत आपला ब्रॅंड (Farming Brand) तयार करण्याची गरज आहे, यासंबंधी शेटफळ (ता.करमाळा) (Shetafal) येथील शेतकरी गटाचे कार्य दिशादर्शक असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसारख्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे (Sanjay Wakde) यांनी शेटफळ येथील गटशेतीला भेटी दिली, याप्रसंगी शिवारफेरी कार्यक्रमात प्रत्यक्ष प्लॉटवर जावुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेटफळ येथील लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनी व नागनाथ शेतकरी गटाच्यावतीने शिवारफेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. वाकडे यांनी गटशेती प्रकल्पातील शेतकऱ्यांसह प्रगतीशील शेतकऱ्यांच्या केळी,पेरू सिताफळ प्लॉटवर जाऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी गटशतीच्या माध्यमातून पेरू पिकाचे येथिल नानासाहेब साळूंके, विजय लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग करत लोकविकासचा ब्रॅंड तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शेटफळ येथील गटशेती मधील शेतकऱ्यांचेशेतीमधील नियोजन व बाजारभिमुख शेतीपद्धती व नियोजन वाखान्यांजोगे असून इतर शेतकरी यंचेसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पॅकहाऊसला भेट देऊन पाहणी करून सुचना केल्या, यावेळी लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, विष्णू पोळ, गजेंद्र पोळ, विजय लबडे, कैलास लबडे, नानासाहेब साळूंके, जिजाऊ शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे, मंदाकिनी साळूंके, शिवाजी निंबाळकर, शिवाजी नाईकनवरे, राजेंद्र साबळे,सचिन निंबाळकर,सनी पोळ यांच्यासह गटातील शेतकरी उपस्थित होते.


