नंदन प्रतिष्ठान आणि भाजपा व्यापार आघाडीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर – 50 पेक्षा जास्त नारिकांची तपासणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : भाजपा व्यापार आघाडी आणि नंदन प्रतिष्ठान करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, हे शिबिर करमाळा शहरातील श्री संत संताजीनगर येथील प्रांगणात हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक नगरिकांची तपासणी करण्यात आली तसेच तपासणी केलेल्या 7 रुग्णांची मोतिबिंदू ऑपरेशन पुढील आठवड्यात उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे निःशुल्क केले जाणार असल्याचे भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष तथा नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया यांनी म्हटले आहे.

या शिबिराचे उद्घाटन मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप आणि भाजपा माजी तालुकाध्यक्ष संजय घोरपडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सक तज्ञ डॉ.अनिल खटके आणि डॉ.सखाराम गर्जे यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस सुहास घोलप,अमरजित साळुंखे,शाम सिंधी,महिला आघाडीच्या संगीता नष्टे,चंपावती कांबळे, प्रतिष्ठान चे प्रकाश क्षिरसागर,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर, निलेश माने,रोहित कोळेकर,सचिन चव्हाण,महेश क्षिरसागर,दिपक देवकर,अक्षय परदेशी,संजय जमदाडे,पत्रकार दिनेश मडके,कैलास मिटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या शिबिरासाठी विशेष सहकार्य अनंत ऑप्टिशियनचे संजय कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!