करमाळा तालुक्यात लम्पीरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव - क्वारंटाईन सेंटर उभारावे : चिंतामणी जगताप - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यात लम्पीरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव – क्वारंटाईन सेंटर उभारावे : चिंतामणी जगताप


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही बाब गंभीर असुन शासनाने व पशुसंवर्धन विभागाने तातङीने करमाळा तालुक्यात पशु क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यात एकुण गाय वर्ग जनावरे 64541 आहेत, त्यामधील लम्पी बाधित 3915 आहेत , उपचाराने बरे झालेले जनावरे 2538 आहेत, सद्यस्थितीला उपचार चालु असलेली जनावरे 1117 असुन लम्पी आजाराने मृत जनावरांची संख्या 260 इतकी पोहचली आहे.

या वाढत्या रोगामुळे करमाळा तालुक्यात बाधित पशुं करीता क्वारंटाईन सेंटरची मागणी करमाळा तालुका पशुसंवर्धन विभागाने त्यांच्या वरीष्ठ कार्यालया कङे केली आहे परंतु अध्याप क्वारंटाईन सेंटर झालेले नाही. करमाळा तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्याने बाधित पशु पालकांच्या शेतात जावुन उपचार देणे कठीण होत असल्याचे प्रखरतेने जाणवत आहे. या शिवाय बाधित जनावरे इतरत्र असल्याने त्यांचाही संसर्ग वाढत आहे.

त्यामुळे लम्पी क्वारंटाईन सेंटर स्थापन झाल्यास सर्व बाधित जनावरे एकाच ठिकाणी असल्यास उपचारासाठी वेळही कमी लागेल आणि लम्पी रोगाचा प्रादुर्भावही थांबवता येईल , क्वारंटाईन सेंटर करीता जर जागेची गरज पशुसंवर्धन विभागास लागली तर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा उपलब्ध करून देवु , अशी सुचना करीत ,लम्पी क्वारंटाईन सेंटर ची मागणी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी पशुसंवर्धन विभागाच्या वरीष्ठ कार्यालयाकङे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!