पोथरेत उद्या शुक्रवारी मोफत डोळे तपासणी शिबिर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथे ओम आय केअर अँड ऑप्टिकल टेंभुर्णी व श्री टेके आय क्लिनिक सांगली व ग्रामपंचायत पोथरे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत डोळे तपासणी, ऑपरेशन व अल्प दरात चष्मे वाटप शिबिराचे उद्या (ता.१८) शुक्रवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. तरी पोथरे व पंचक्रोशीतील गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नागरिकांच्या डोळ्याच्या समस्या दूर करण्यासाठी एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. यामध्ये पडद्याच्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया, पडदा निसटणे, पडद्याची शस्त्रक्रिया, डोळ्यातील मास वाढणे आधी विविध प्रकारच्या आजारावर यामध्ये उपचार केले जाणार आहेत. गरजूंनी येताना आधार कार्ड फोटो ओळखपत्र रेशन कार्ड सोबत घेऊन येऊन आपली नोंदणी करावी.

नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणी अथवा 82 61 90 41 22 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी पोथरे येथील भैरवनाथ मंदिरामध्ये सकाळी नऊ ते अकरा घेण्यात येणार आहे तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव काकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!