लिंगायत कोष्टी समाजाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी गजेंद्र गुरव यांची तर उपाध्यक्षपदी आनंद न्हावकर यांची निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कुरूहिनशेट्टी लिंगायत कोष्टी समाजाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी गजेंद्र गुरव यांची तर उपाध्यक्षपदी आनंद न्हावकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर खजिनदार पदी सचिन माहुले, सचिव पदी जयंत कोष्टी यांची निवड करण्यात आली आहे.

Yash collection karmala clothes shop

या निवडी करमाळा येथे आयोजित बैठकीत करण्यात आल्या. भविष्यामध्ये कोटी समाजाचा विकास व्हावा तसेच कोष्टी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेणार असल्याचे निवडीनंतर अध्यक्ष गजेंद्र गुरव यांनी सांगितले. यावेळी कुरूहिनशेट्टी लिंगायतकोष्टी समाज महाराष्ट्र राज्य युवा कार्यकारिणी सदस्य सतीश शहापुरे यांनी समाजाला मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश राक्षे, विजय राक्षे, भारत माहुले, राजेंद्र माहुले, दिपक न्हावकर, राजेंद्र मुंजेगावकर, सचिन माहुले, उमेश माहुले, शिवाजी माहुले, नंदकुमार हुंबाडे, कानिफनाथ आगम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!