करमाळा शहरातील वेताळपेठेतील श्रीराम मंदिराचा जीर्णोध्दार सुरु - मदतीचे आवाहन - Saptahik Sandesh

करमाळा शहरातील वेताळपेठेतील श्रीराम मंदिराचा जीर्णोध्दार सुरु – मदतीचे आवाहन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वेताळपेठ (करमाळा) येथील श्रीराम मंदिराचे जीर्णोध्दारचे काम चालू असून, स्लॅब लेवलला काम चालू आहे. तरी मंदिर उभारणीसाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. वेताळपेठेतील जुने श्रीराम मंदिराचे रूपांतर नवीन मंदिरात होत आहे. या ठिकाणी आरसीसी मध्ये बांधकाम चालू आहे. भाविक आर्थिक मदत करत आहेत. सध्या स्लॅब लेवलला बांधकाम असल्याने आर्थिक मदतीची गरज आहे. भाविकांनी स्वच्छेने सिमेंट, खडी, वाळू किंवा रोख स्वरूपात मदत दिली तरी चालेल. अधिक माहितीसाठी विजय देशपांडे (मो.९४२०७८२९९८), दर्शन कुलकर्णी, महेश परदेशी, राधेशाम देवी येथे संपर्क साधून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

Shriram temple Karmala renovation news vetal peth | saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!