करमाळा तालुका लॅबोरेटरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश परदेशी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : लॅबोरेटरी ॲनालिस्टस् ॲक्टीव्ह फोरम फॉर ॲक्शन (लाफा) या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मारकड यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुका संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गणेश परदेशी, उपाध्यक्षपदी संगीता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच या संघटनेच्या सचिवपदी सोनाली क्षीरसागर, कोषाध्यक्ष पदी नवनाथ शेळके व संघटक पदी प्रफुल्लता देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष श्री.मारकड म्हणाले, की संघटना ही कौन्सील रजिस्टर नसलेल्या लॅब धारकांना आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे व होत नसल्यास रक्त तपासण्या करू नयेत. त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल.
