कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्ताने माजी विद्यार्थ्याकडून प्रशालेला व्यायाम साहित्य भेट
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील श्रीम.रा.बा.सुराणा विद्यालय चिखलठाण येथील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांच्या प्रेरणेने कैलास कानगुडे केडगाव (ता.करमाळा) यांचे चिरंजीव दिनेश कानगुडे मुंबई या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे औचित्य साधून डबल बार व सिंगल बार हे व्यायामाचे साहित्य आमदार संजयमामा शिंदे करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते करमाळा येथे प्रशालेचे मुख्याध्यापक यांना सुपूर्द केले.
यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तथा मा. जि.प.उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने व विद्यालयातील जेष्ठ शिक्षक धनंजय भोसले, शिवाजी मासाळ, लक्ष्मण गोडगे, साईनाथ लोहार ,अतुल जानभरे, हनुमंत लगस उपस्थित होते.