गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालक प्रबोधनपर हळदीकुंकू कार्यक्रमासह विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालक प्रबोधनपर हळदीकुंकू कार्यक्रमासह विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न


करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालक प्रबोधनपर हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, याच कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यार्थी, महिलांना मार्गदर्शनपर प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या व्याख्यान सोबत शाळेमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 400 महिलांनी सहभाग घेतला. या सर्व महिलांमध्ये अतिशय चुरशीचे व अटीतटीचे सामने झाले. अंतिम सामन्यापर्यंत टिकलेल्या महिलांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आला, त्यांना शाळेकडून आकर्षक पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या नर्सरी ते दुसरी पर्यंतच्या पालकांचा एक गट व तिसरी ते दहावीपर्यंतच्या पालकांचा एक गट नर्सरी ते दुसरी पर्यंत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान सौ.रूपाली लक्ष्मण सरोदे यांना मिळाला, पारितोषिक सोन्याचे बदाम. द्वितीय क्रमांक सौ.प्रियांका गणेश बेडकुते पारितोषिक चांदीचा वाटी चमचा तर तृतीय क्रमांक सौ.मयुरी शैलेश गंधे पारितोषिक चांदीचा छल्ला व उत्तेजनार्थ क्रमांक कल्पना चंद्रकांत फुके यांना देण्यात आला. शाळेकडून त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तर दुसरी ते दहावीपर्यंतच्या गटामध्येही चार क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक महिला आरती पराठे पारितोषिक सोन्याचे बदाम द्वितीय क्रमांक अनुराधा बर्डे पारितोषिक चांदीची वाटी व चमचा तृतीय क्रमांक योगेश्वरी दराडे पारितोषिक चांदीचा छल्ला उत्तेजनार्थ प्रियांका पाटील पारितोषिक आकर्षक भेटवस्तू अशा प्रकारे शाळेकडून एकूण आठ महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले अशाप्रकारे संस्थेचे संस्थापक प्रा.नितीन भोगे सर व भोगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!