जि.प.खडकी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे अनोखे दर्शन - Saptahik Sandesh

जि.प.खडकी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न – विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे अनोखे दर्शन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी (ता. करमाळा) या शाळेचे दि – ९ फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलन झाले. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमात लावणी, कॉमेडी ॲक्ट, लिली पुट डान्स , देवत छत्रपती, दोनच राजे, लिंबूनीचे लिंबू, दही दूध लोणी, जलवा जलवा, चंद्रा , कोळी गीत, दीप डान्स आशा विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन केले.

सदर कार्यक्रमात खडकी शाळेतून बदली झालेल्या व जिल्हा आदर्श पुरस्कार मिळालेल्या श्री सोमेश्वर देशमाने, श्री .तु. बा . काळे, श्री धनंजय कुंभार, श्री आण्णासाहेब जाधव श्रीम. प्रफुल्लता सातपुते, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमास जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रमाकांत गटकळ, श्री .संतोष पोतदार, श्री सुनिल कदम, वारे गुरुजी, कणसे गुरुजी होनकळसे श्री गणेश आडेकर व केंद्रातील अनेक शिक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील व श्री नागेश जाधव माजी डेप्युटी कमिशनर हे उपस्थित होते.

यावेळी करे पाटील यांनी यशकल्याणी संस्थेच्यावतीने शाळेस स्मार्ट TV देण्याचे घोषणा केली . व गावातील लोकांनी मुलांच्या गुणांचे कौतुक करून बक्षिस स्वरूपात ६४००० रुपये जमा झाले . या कार्यक्रमास गावाचे सरपंच सौ चंद्रकला उमेश बरडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंगद शिंदे माजी सरपंच श्री बळीराम शिंदे मार्केट कमिटी सदस्य श्री जनार्धन नलवडे आदी सह उपस्थित सर्व ग्रामस्थ विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .

सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच मुख्याध्यापक श्री विलास शिराळ पदवीधर शिक्षक श्री सुहास कांबळे, श्री प्रविण शिदे, श्री चंद्रकांत वीर, श्री महादेव शिंदे, श्री शशिकांत क्षिरसागर श्रीम. सुनिता काळे, सौ वारे मॅडम यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!