पारेवाडी शिवारात सापळा रचून करमाळा पोलिसांनी पकडले अट्टल गुन्हेगाराला…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.18) : पारेवाडी (ता.करमाळा) गावच्या शिवारात अट्टल गुन्हेगार फिरत आहे, अशी माहिती मिळताच, करमाळा पोलीस स्टेशनचेपोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्याठिकाणी सापळा रचून पकडले आहे. दरोडा, जबरी चोरी, मारहाण तसेच विविध गुन्हेगारी करणारा फरारी आरोपी खाजा राजेंद्र काळे (वय 40) रा. भगतवाडी (ता. करमाळा) यास मोठ्या सिथाफीने अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, करमाळा पोलीस ठाणे कडील तसेच रेल्वेमध्ये दरोडा,जबरी चोरी मधील फरारी आरोपी जिंती भगतवाडी-केत्तुर शिवारात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कुंजीर,पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, यांचे पथक रवाना केले.

या पथकाने सदर आरोपीवर करमाळा पोलीस ठाणे मध्ये भादवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा, दौंड,कुर्डुवाडी,बारामती येथे आजपर्यंत दरोडा ,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे 11 गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, सदरचा आरोपी कोणाला पाहिजे असल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी केले आहे.

सदर प्रकरणाची केलेली कारवाई सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे ,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे. याबाबतीत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री.हराळे हे करत आहेत.
