‘समान नागरी कायदा’ विषयावर कायदेतज्ञांचा परिसंवाद – ॲड.सविता शिंदे यांचे व्याख्यान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मंगळवेढा येथील सजग नागरीक संघाच्यावतीने मंगळवेढा येथे ‘समान नागरी कायदा’ या विषयावर कायदेतज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सध्या देशात ‘समान नागरी कायद्याची’ चर्चा सुरू आहे. याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. सर्वसामान्य नागरिक अनभिज्ञ आहेत. या विषयाची कायदेविषयक परिपूर्ण माहिती कायदेतज्ञांमार्फत आपल्या जनतेला व्हावी. या उदात्त हेतूने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये ॲड.खतीब अध्यक्ष (सोलापूर), ॲड. बापूसाहेब देशमुख (सोलापूर), ॲड.सविता शिंदे (करमाळा), ॲड.भारत बहिरट (पंढरपूर), ॲड.शिरीष पवार (मंगळवेढा) यांचा ‘समान नागरी कायदा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
याप्रसंगी मंगळवेढा येथील धनश्री महिला सह.पतसंस्था च्या चेअरमन शोभा शिवाजीराव काळुंगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी सायं. ६ ते ७ वाजता सुरसंगम मराठी गीतांचा कार्यक्रम व ७ वाजता परिसंवाद सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन सजग नागरिक संघ यांनी केले असून मंगळवेढा येथील मारूतीचे पटांगण याठिकाणी कार्यक्रम होणार आहे.